MB NEWS-दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध

दोन दिवसाच्या शोध मोहीमेनंतर "त्या" वाहून गेलेल्या चिमुकल्याचा लागला शोध गेवराई — शाळेतून घरी जाणारा एक 3 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्याची दुर्दवी घटना सोमवारी ता. 26 रोजी दुपारी घडली होती. पहिल्या दिवशी शोध मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, रात्र झाल्यावर मोहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी, मंगळवार ता. 27 रोजी सकाळीच शोध कार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यानी केलेल्या अथक परिश्रमानंतर सायं पाच वाजता विद्रूपा नंदीच्या किनारी घटनास्थळा पासून पाचशे मीटर अंतरावर कु. बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर ( वय वर्ष 3 ) याचा मृतदेह आढळून आला. त्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह दिसताच जमावाला गहिवरून आले. सोमवारी अकरा वाजता गेवराई शहरात जोरदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला होता. नाली दिसली नाही. त्यामुळे, दोन मुला पैकी एक मुलगा अचानक पडून वाहून गेल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहरात झालेल्या जोरदार पावसाने नाला भरून वाहत होता. याच नाल्यात पडून तो वाहून गेला आहे. सदरील नाल्याचे पाणी विद्रुपा नदीला जावून मिळते त्यामुळे मुलाचा शोध घेणे सुरु होते. परंतू, सायंका...