पोस्ट्स

MB NEWS-अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज

इमेज
  अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांची भाऊबीज मुंबई;  :  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना भाऊबीज भेटीपोटी राज्य सरकारतर्फे 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांमधील कुपोषणाशी लढण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1975 मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली असून सध्या राज्यात 10 लाख 8 हजार 5 अंगणवाड्या, मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. तसेच राज्यात सध्या 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत. राज्यात 1 लाख 89 हजार 277 अंगणवाडी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये अदा करण्यात येतात. त्यानुसार 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांना मागील वर्षाप्रमाणे 2 हजार रुपये भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता 37 कोटी 85 लाख 54 हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर भाऊबीज कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे...

MB NEWS-●जोशींची तासिका●नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्याखालचा राजकीय गेम..!

इमेज
  नैतिकता, संस्कृतीच्या बुरख्या खालचा राजकीय गेम..!   ● जोशींची तासिका र मेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये भाजपने उमेदवारी जाहीर करून, अर्ज भरून त्यांचे उमेदवार मुरजी पटेलांना अर्ज वापस घ्यायला लावला हे आता काही तासांत जुने झाले आहे. तो अर्ज वापस घेताना भाजपने नैतिकता, संस्कृती, प्रथा असे जड शब्द वापरले आहेत. ज्यात मुळीच तथ्य नाही. उद्धव ठाकरेंना नामोहरम करायचे असेल तर त्यांच्याकडील शिवसेना पक्षाचे नावं, चिन्हाला धक्का लावणे आणि सध्या प्रशासक असलेली मुंबई मनपा ताब्यात घेणे हे मोठे टार्गेटस अचिव्ह करणे भाजपला क्रमप्राप्त आहे. या पोटनिवडणुकीत अधिकृत शिवसेना नावं आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवून भाजपने आपले पहिले टार्गेट पूर्ण केले. त्यानंतर या निवडणुकीत ज्या पद्धतीने राज ठाकरेंना पुढे करून मुंबईत पॉवर सेंटर मातोश्री नाही तर शिवतीर्थ असेल असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. १५ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जातात. मग १६ ऑक्टोबर रोजी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतात. नंतर राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना "प्रिय मित्र" म...

MB NEWS-यावर्षी शास्त्रीयदृष्टया दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते

इमेज
  दाते पंचांगकर्ते यांची दिवाळीबाबत महत्वपूर्ण माहिती यावर्षी शास्त्रीयदृष्टया  दिवाळी दोनच दिवस -दाते पंचांगकर्ते           वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत जनतेने मौज मजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यावर्षी वसुबारस 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी शनिवारी आहे तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भाकडील काही प्रदेशांत 23 ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे. (धनत्रयोदशी विषयी सविस्तर खुलासा दाते पंचांगात पान ८९ वर दिलेला आहे.) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी सोमवारी एका दिवशी आलेले आहे. 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. ग्र...

MB NEWS-परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान

इमेज
  परळी तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियान कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊंडेशन,संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यांचा उपक्रम               परळी वैजनाथ,दि.17( प्रतिनिधी ) कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन , दिल्ली व संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी जि.बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.16आक्टोबर 2022 रोजी परळी तालुक्यातील अनेक गा्वांमध्ये कैंडल मार्च काढून बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.बालविवाह म्हणजे काय, बालविवाहाचे दुष्परिणाम ,आरोग्यविषयक निर्माण होणा-या  समस्या आदी विषयांवर या जनजागृती रैलिच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यात आले. महिला,मुले, पुरुष आणि काही ठिकाणी वृध्द अशा सर्वांनी या अभियानात आपले योगदान दिले.परळी तालुक्यातील सरफराजपूर,करेवाडी ,वडखेल ,सेलू (स),परचुंडी, देशमुख टाकळी यासह दहा ते अकरा गावांमध्ये हे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.          सन२०११च्या जनगननेेनुसार  महाराष्ट्रात 11लाख 60 हजार 665 बालविवाह झाले आहेत.देशातील एकूण बालविवाहापैकी...

MB NEWS-शिवाजीराव देशमुख यांचे निधन

इमेज
  शिवाजीराव देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ- परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विठ्ठलराव देशमुख (पोहनेरकर- वय ७८) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने परळीतील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  परळीतील स्नेहनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. औरंगाबाद खंडपीठातील अॅड. सचिन देशमुख व वैद्यनाथ विद्यालयातील शिक्षक नेताजी देशमुख यांचे ते वडील होत.         त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास

इमेज
  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती परंतु राज्य सरकार नक्की लक्ष देईल- पंकजा मुंडे यांना विश्वास                      परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार मांडला असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले असून सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक बनली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. अशी मागणी होत असताना भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना व्यथीत करणारी परिस्थिती निर्माण झालेली असून या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकार निश्चित करेल असा विश्वास  व्यक्त केला आहे.          भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था परतीच्या पावसाने व अतीवृष्टीने व्यथीत करणारी झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार निश्चित उभे राहील असा ...

MB NEWS-वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य.

इमेज
  वाचन हे चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे माध्यम !--डॉ. नयनकुमार आचार्य  परळी. वै.-.                       ‌     ‌                 वाचन हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग असून खऱ्या अर्थाने चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे वाचन हे एकच माध्यम आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य यांनी केले.                             येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती भारतरत्न  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री आचार्य "वाचन संस्कृतीचे संवर्धन"  या विषयावर बोलत होते.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ. डी. व्ही. मेश्राम हे होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात बोलतांना श्री आचार्य यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी...