MB NEWS-जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन !

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ! पुणे- साहित्य,लेखन,अभिनय,दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात आपली छाप सोडणारे चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.तुझेच मी गीत गात आहे या टीव्ही मालिकेत ते सध्या काम करत होते.गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. चित्रपट, मालिका आणि ...