MB NEWS-■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश

■किसान सभेच्या लढ्यास आणखी एक यश ●जिल्हाभरातील सर्वच महसूल मंडळास मिळवून दिला हक्काचा विमा परळी / प्रतिनिधी रस्तावरील आंदोलने, शासन दरबारी पाठपुरावा, कायदेशीर लढाई ,सोशल मीडिया ऑनलाईन ट्रेंड या सर्वच पातळीवर बीड जिल्हा किसान सभेने केलेल्या लढाईस आणखी एक यश मिळाले असून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पीक विमा कंपनीस विमा देण्यास भाग पाडले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना हा विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे.दुसरीकडे सण 2020 च्या खरीप पीक विमा बाबत केलेले आंदोलने व अभ्यासपूर्ण अहवाल शासन दरबारी मंत्रालयात राज्य तक्रार निवारण समिती समोर मांडत सण 2020 ची किसान सभेने केलेली पीक विमा देण्याची मागणी राज्य तक्रार निवारण समिती ने योग्य असल्याचे मत व्यक्त करीत पीक विमा कंपनीस खरीप 2020 चा पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावा असे आदेश पीक विमा कंपनीस दिले आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नी खंबीरपणे पाठीशी असलेल्या किसान सभेच्या विविध मागण्या आता मंजूर करण्यात येत असून किसान सभेने केलेल्या विविध लढ्याचे हे यश आहे. बीड जिल्हातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा ...