पोस्ट्स

MB NEWS-सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

इमेज
  सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये  प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर ...

MB NEWS-सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन

इमेज
  सरकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती 8 डिसेंबरला साजरी करण्याचे श्री शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन परळी वैजनाथ ता.०६ (प्रतिनिधी)        श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परित्रक काढले आहे. त्यामुळेे तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.          सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत होती. त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गुरुवारी (ता.०८) संताजी महाराजांचा जन्म दिवस साजरा करण्यात येतो. यासंदर्भात गेल्या वर्षी पासून महाराष्ट्र शासनाने परित्रक...

MB NEWS-स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान

इमेज
  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान परळी वैजनाथ,प्रतिनिधी...     सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून गरजुंना मदतीचा हात देणाऱ्या  स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजु रुग्णाला व्हील चेअर आणि एअर बेड प्रदान करण्यात आले.       भीमनगर मधील संतोष दत्तात्रय धाटे या युवकाचा एक महिन्यापूर्वी गंभीर अपघात होवून मेंदूला मार लागल्याने पाय अधू झाले आहेत.पुणे येथे दीर्घ उपचार होवून सध्या संतोष धाटे यांच्यावर फिजीओथेरपी चालू आहे.धाटे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असून संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड घेणे आवश्यक होते ही बाब माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भीमनगर मधील सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली.         त्या अनुषंगानेआज स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संतोष यांचे वडील दत्तात्रय धाटे यांना संतोषसाठी व्हील चेअर आणि एअर बेड देण्यात आला.यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भागवत कसबे,सुभाष कांबळे,प्रताप समिंदरसव...

MB NEWS-योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

इमेज
  पुर्णाहुती महापूजेने श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता  योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी   अंबाजोगाई   -    महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी  सकाळी १० वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची  गर्दी झाली होती.          श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. यावेळी झालेल्या महापूजेला अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव व सौ.शिवकन्या यादव  यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी  देवल कमिटीचे अध्यक्...

MB NEWS- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा- अनंत इंगळे

इमेज
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करा-  अनंत इंगळे परळी (प्रतिनिधी.)   शहरातील रेल्वे स्थानका समोरील तसेच बस स्टँड कडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सूशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे सरचिटणीस अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति माजी मंत्री आ.धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांनाही देण्यात आल्या आहेत.       याबाबत अनंत इंगळे यांनी परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी शहरातील विविध चौकांचे नगरपालिकेच्या वतीने जसे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच सुशोभीकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे ही करावे.      परळी बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच रेल्वे स्थानकाच्या समोरील मुख्य रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून हा चौक अस्तित्वात आहे. परळी शहरात मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच इटके कॉर्नरला असणाऱ्या संभाजी चौक आदि चौकांचे नगरपालिक...

MB NEWS-श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम

इमेज
  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम परळी वैजनाथ / प्रतिनिधी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक पोर्णिमेनिमित्त श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने खिचडी प्रसादाचे आयोजन भाविक-भक्तांसाठी करण्यात येते तसेच बुधवारी आलेल्या श्री दत्त जन्मोत्सव निमित्त दुहेरी योग साधत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सव निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बुधवार दि. 7 डिसेंबर 2022 रोजी झाली होती.  श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी तपोनुष्ठान समितीच्या वतीने वतीने पुजन श्री.नरेश साखरे, श्री.चंद्रकांत उदगीरकर व श्री.वैजनाथआप्पा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री दत्त जन्मोत्सवच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. हज...

MB NEWS- लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा

इमेज
 लग्नकार्यातील जेवणातून ५० महिलांना विषबाधा अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथील घटना अंबाजोगाई - लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी (दि.०६) घडली. सुदैवाने सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.       गीत्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि.०५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातील काही महिलांना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुपारनंतर बाधित महिलांची संख्या वाढल्याने त्यापैकी ३६ महिलांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काही महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, सर्व महिलांची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. सध्या स्वाराती रुग्णालयात संध्या दिनेश शिंदे (३५), नीता भागवत शिंदे (४१), अ...