MB NEWS:खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला

खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा" अशा प्रकारचे धमकीचे पत्रच एका घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत मात्र अशा प्रकारचे धमकीचे पत्र मिळाल्याने दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग उद्भवला आहे. पोलीस प्रशासन अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घराला धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिटकवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे...