MB NEWS:शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड

शिवराज कातकडे यांची एमपीएससीतून सहायक कक्ष अधिकारीपदी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी), :- दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेतून कातकडे शिवराज विश्वांभर यांची सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर निवड झाली. कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाल्याबद्दल सर्वसाधारण अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारी या विभागीय परीक्षेतून सहायक कक्ष अधिकारी (वर्ग - 2 ) या पदावर कातकडे शिवराज विश्वांभर यांची निवड झाली आहे. कातकडे शिवराज विश्वांभर , रा.कातकरवाडी, कातकरवाडी ,या छोट्याशा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण व बडवणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले..परभणी येथे DTed चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. जिद्द आणि चिका...