MB NEWS:कवी साळेगावकरांच्या 'प्रसन्न प्रहार' विडंबन काव्यसंग्रहाचे शुक्रवारी कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रकाशन

कवी साळेगावकरांच्या 'प्रसन्न प्रहार' विडंबन काव्यसंग्रहाचे शुक्रवारी कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रकाशन माजलगाव: आपल्या खुमासदार शैलीने सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर विडंबन करून अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या 'प्रसन्न प्रहार' या विडंबन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे ॠषितुल्य ख्यातनाम व्यक्तिमत्व हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते माजलगाव येथे संपन्न होणार आहे. दि.3 मार्च 2023 रोजी वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव येथे सायं.5.30 वा.संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी आमदार डी.के. देशमुख, प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवी श्रावण गिरी, सूत्र संवादक राजेसाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास व कवी नायगावकरांच्या खुमासदार हास्यरसाच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन आयोजक गझलकार दिवाकर जोशी, कवी संजय सपाटे , सौ.माधुरी साळेगावकर, डॉ. स्वानंद कुलकर्णी, पत्रकार हिमांशू देशमुख, कवी प्रवीण काळे, अभिजित गिरी यांनी केले आहे