MB NEWS:घाटनांदुर, निरपना, बागझरी, सोमनवाडीत जलजीवन मिशनच्या १४ कोटीच्या कामाचा थाटात शुभारंभ

विकासाबरोबरच मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं - पंकजाताई मुंडे *तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच, मला ओटीत घ्या ; गावोगावी लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही* *घाटनांदुर, निरपना, बागझरी, सोमनवाडीत जलजीवन मिशनच्या १४ कोटीच्या कामाचा थाटात शुभारंभ* *ग्रामस्थांकडून लेकीचे जल्लोषात स्वागत ; गावागावात दिवाळी !* *माझा विरोध व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला ; सत्तेला अहंकाराची बाधा आली की गर्वाचं घर खाली होतं* अंबाजोगाई ।दिनांक ०५। राजकारणात माझा कोणा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला आहे. राम, अर्जुनासारख्या प्रवृत्ती समाजाचं भलं करत असतात, धर्माची स्थापना करत असतात. याऊलट रावण अहंकारी होता, अगदी तसंच राजकारणात जेव्हा सत्तेला अहंकाराची बाधा होते तेव्हा गर्वाचं घर खाली होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ विकासच नाही तर परळी मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं. तुमची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे, त्यासाठी आता तुम्हीच मला दत्तक घ्या, गावोगावी विकासाची लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पं...