MB NEWS:बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे

● परळीत गुढीपाडव्यापासून सुरु होणार बाल संस्कार केंद्र: आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन बालसंस्कार केंद्र ही काळाची गरज- आ.धनंजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... आजकाल मोबाईल, कार्टून, गेम्स, व्हीडीओ या नव्या माध्यमांच्या वर्तुळात वाढणाऱ्या लहान मुलांना गोष्टींतून संस्कार देणे अनेकदा कठीण होते. पूर्वी आजी-आजोबांच्या गोष्टीतून जगण्याची दिशा आणि शिस्त मुलांमध्ये रुजविली जात असे. आता ही सहज बाबही मागे सरत आहे. हाच हेतू समोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परळीत बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात येत आहे.आ.धनंजय मुंडे यांच्याहस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.संस्कार केंद्र ही काळाची गरज असुन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजू, प...