MB NEWS:जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना

जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना परळी (प्रतिनिधी)... महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत 10 एप्रिल पासून होत असलेल्या फ गटात असलेल्या बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षीय संघात परळी येथील व्यंकट जोशी सर संचलित तथा मराठवाडा पातळीवर नावलौकिक असणाऱ्या जोशीज क्रिकेट अकॅडमीचा राम संजय मस्के याची निवड झाली असून सामने खेळण्यासाठी 10 एप्रिल रोजी कोल्हापूरकडे रवाना झाला. एकूण 48 संघाचा सहभाग असलेल्या 2 दिवसीय लीग सामन्यात फ गटात असलेल्या बीड संघास डेक्कन जिमखाना,सिधुदुर्ग,पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन,झोरास्ट्रेन आणि सि डी ए संघांचे आवाहन असणार आहे. राम मस्के यास सहकारी म्हणून सचिन संजय धस यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. सध्या सचिन धस हा एक राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी खेळाडू असून त्याला येणाऱ्या 2024-U-19 वर्ल्ड कप चा दावेदार मानला जातो. राम मस्के गेली 5 वर्षांपासून परळीतील नावाजलेल्या जोशीज क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटचे धडे गिरवतो. याशिवाय अकॅडमी कडून खेळताना राम विकेट कीपर बॅट्समन असून कीपिंग मध्ये ...