MB NEWS:स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला

 स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक  ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला

अंबाजोगाई (प्रतिनिधी)--

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयातील एक कर्मचारी (लिपीक) ३७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडला असल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास ३७ हजार रुपयांची लाच स्विकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे रंगेहाथ पकडले असल्याची मिहिती मिळते आहे. सदरील घटनेला अधिष्ठाता कार्यालयातुन दुजोरा मिळाला असून अशोक नाईकवाडे यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते आहे.


Click:■ ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? ● _परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_



     या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता कार्यालयातील लिपीक अशोक अच्चुतराव नाईकवाडे वय ४२, कनिष्ठ लिपीक याने तक्रार दार यास त्यांचे मयत सासरे यांच्या जागेवर त्यांचे पत्नीस अनुकंपा धर्तीवर नौकरी लावतो म्हणून ८० हजार रुपयांची मागणी केली होती. अंतर ३७ हजार रुपयांवर तोडफोड होवून १० एप्रिल २३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील आशियाना हॉटेल येथे ३७ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.

सदरील कार्यवाही लाचलुचपत विभागाचे  पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी केली. यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांचा समावेश होता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !