पोस्ट्स

इमेज
  लोखंडी गज  उघडे  पडल्याने अपघातांना निमंत्रण   नेकनूर,  अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीत मार्गावर नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून रस्ते कामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गज उघडे पडले असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन संबंधीत प्रकरणात जबाबदार ठेकेदार एचपीएम कंपनी व अभियंत्यावर कारवाई करण्यात येऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे, मुख्य अभियंता म.रा.र.वि.म(मर्या) मुंबई यांना केली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा अवमान --- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी दुरावस्थे संदर्भात डॉ.गणेश ढवळे यांनी दि.०२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिल्यानंतर त्या अनुषंगाने अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांना नियमानुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत कळवले होते ...
इमेज
  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत साडे बारा लाखधाडसी चोरी सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हिआर गायब लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी ; सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत घटनास्थळी दाखल  नेकनूर,        दि.११ जुन रविवार रोजी मध्यरात्री बीड तालुक्यातील  लिंबागणेश येथील अहमदपूर-अहमदनगर  राष्ट्रीय महामार्गावरील  लिंबागणेश  महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी .सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत तसेच नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक अजय पानपाटील,चालक शेख लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ,नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,ठसेतज्ञ, श्वानपथक टीम दाखल झाली असुन स्थळपंचनामा करण्यात आला असून तपास चालू आहे.       मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोंडुन आत प्रवेश केला व स्ट्रागरूम कटरने फोडुन बँक मनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्क...
इमेज
माजी मंत्री आ. प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते झालं सिरसाळ्यात उद्घाटन   परळी तालुक्यातील सिरसाळा बाजारपेठ झपाट्याने विकसित होत आहे.  थावरे परिवारच्या 'मोरया ऑटोमोबाईल' सिरसाळा या ट्रॅक्टर स्पेर्स पार्टसच्या दलनाचे उदघाटन *माजी मंत्री आ. प्रकाशदादा सोळंके* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, मार्केटचे संचालक लक्ष्मणराव पौळ, माजी सभापती मोहनदादा सोळंके, नरहरराव निर्मळ, माजी सरपंच सतीश आचार्य, सपकाळ महाराज, सुंदरराव माने, माने बापू, वसंतराव राठोड, रुक्षराज निर्मळ, राजाभाऊ पौळ, सचिन सोळंके, प्रभाकर पौळ, महादूजिजा, शरद कदम व इत्यादी उपस्थित होते.   मोरया ऑटोमोबाईल मध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर दुरुस्ती तसेच महिंद्रा, स्वराज या कंपनीचे स्पेर्स पार्ट, विविध ऑइल & ग्रीस येथे  उपलब्ध करण्यात आले आहेत.

वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने

इमेज
वसंत राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने  परळी वै ता १० प्रतिनिधी     वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.       परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यात पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत राठोड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल बंजारा समाजातील मान्यवरांच्या हस्ते वसंत राठोड यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग राठोड, डि.एस.राठोड सर, मालेवाडी चे सरपंच लक्ष्मण पवार, सुशील राठोड अरुण पवार सर, प्रकाश चव्हाण, परमेश्वर गित्ते, रमेश पवार, अंकुश पवार, विकास पवार, प्रविण पवार, सोहम राठोड, मोहन राठोड यांची उपस्थिती होती.
इमेज
  पंकजाताई मुंडे चार दिवसाच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर मोदी @ 9 अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांना उपस्थिती ; कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे आजपासून चार दिवस मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल एक विशेष अभियान त्यांच्या उपस्थितीत विविध विधानसभा क्षेत्रात  पार पडत आहे.    मध्यप्रदेशच्या चार दिवसाच्या दौऱ्याकरिता आज सकाळी पंकजाताई मुंडे नागपूरहून जबलपूरला रवाना झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीबद्दल त्यांच्या उपस्थितीत एक विशेष अभियान मध्यप्रदेश भाजपकडून   राबविण्यात येत आहे. जबलपूरसह शहाडोल, बालाघाट, मंडला आदी क्षेत्रात त्यांचे विविध कार्यक्रम, पत्रकार परिषदा, जनसभा, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठका आदींचे आयोजन केले गेले आहे. तत्पूर्वी आज सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. याठिकाणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्याशी भेट झाली. त्या...

खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार

इमेज
 खा.रजनीताई पाटिल यांच्या हस्ते नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पञ देऊन केला सत्कार परळी प्रतिनिधी  केज येथे खा.रजनीताई पाटिल,माजी खा.अशोक पाटिल युवाने आदित्य पाटिल जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात व विविध विषयावर एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली याच बैठकीत परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या नविन पदाधिका-या नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आसुन लागलीच त्यांना नियुक्ती पञ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. परळी विधानसभा युवक अध्यक्ष रणजित देशमुख यांनी जिल्हा अध्यक्ष व युवक जिल्हा अध्यक्ष यांच्या अनुमतीने पूर्वी अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले धर्मराज खोसे यांना युवक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली तर  शेख अलीम शेख नूर,यांची युवक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली व कार्याध्यक्ष मजमुन महेश वडके,उपाध्यक्ष अजय पिंपळे. ऋषिकेश लोमटे,लखन सुरवसे,सैय्यद फारुक,मारुती दराडे,रवींद्र देशमुख, उज्जेफ सिद्दीकी  यांना नियुक्ती पत्र बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष राहुल भय्या सोनवणे यांच्या उपस्थित आद...
इमेज
  MB NEWS |माझी बातमी - E-Paper 10 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ●  आजचा डिजीटल पेपर. Page no.1.......  मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी  MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा   MB NEWS  वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebo...