%20(5).jpeg)
जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. तसेच इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत अशी भूमिका जाहीर केली आहे.यानंतर राष्ट्रवाद पक्ष कोणाकडे आहे याबद्दल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल...