पखवाज वादक सनतकुमार बडे यांचे सादरीकरण

११ वीच्या विद्यार्थिनींचे वेलकम आणि 'अनाहत' मासिक संगीत सभा : महिला महाविद्यालयात उपक्रम आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करा, मन लावून तळमळीने अभ्यास करा,नाव लौकिक आपोआप मिळते... पखवाज वादक सनतकुमार बडे ११ वीला प्रवेश घेताना आपले ध्येय निश्चित करा..त्यानुसार प्रवेश घ्या.व ध्येय पुर्ण करा..प्राचार्या डॉ विद्या देशपांडे परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी) येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात कनिष्ठ विभाग व संगीत विभागाच्या वतीने ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम व 'अनाहत' मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमुख पाहुणे सनतकुमार बडे, प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता मा...