पोस्ट्स

कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार

इमेज
महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे- कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार मुंबई दि:8 :शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, उपमहाव्यवस्थापक सुरेश सोनवणे, सुजित पाटील, ज्योती देवरे, महेंद्र बोरसे, महेंद्र धांडे देवानंद दुथडे, गणेश पाटील यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. महामंडळाची 13 विभागीय कार्यालये आणि 10 उत्पादन घटक कार्यरत आहेत. त...

जिल्हानिहाय सविस्तर माहिती.....

इमेज
  जाणून घ्या सविस्तर तपशील:  महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद पदभरती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ दिनांक ४ मे २०२२. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८ दिनांक १० मे २०२२ महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे शासन निर्णय क्रमांक पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क. दिनांक ३० सप्टेंबर २०२२, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.११/आस्था-८ दिनांक २१ ऑक्टोबर २०२२, महाराष्ट्र शासन, वित्त विभागाकडील शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२०/२०२२/आ.पु.क. दि. ३१ ऑक्टोबर २०२२. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ११/आस्था-८ दिनांक १५ नोव्हेंबर २०२२. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/ प्र.क्र. १३६/का- १३ ब दिनांक २१ नोव्हेंबर २०२२, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे २०२३, महाराष्ट्र शासन, ग्रामविक...

आंदोलन: न्याय्य मागण्या :सहभागी व्हा

इमेज
  आशा वर्कर्स व गटप्रवर्तकाचा वतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा परळी वैजनाथ: बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा  परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या  मोर्चात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेचे नेते प्रा.बी.जी खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.           १. आशा व गटप्रवर्तकांना दिपावली भाउबीज म्हणून आशांना रू.१०,०००/- व गटप्रवर्तकांना रु.१५,०००/- भाउबीज देण्यात यावी. २. परळी तालुक्यातील आशांचा केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २०२२ सहामहिण्याचे रू.६०००/- देण्यात यावे. ३. आशा व गटप्रवर्तकाची नियुक्ती कामावर आधारीत मोबदल्यावर असल्यामुळे त्यांना कामाची सक्ती करू नये.४. आशाना कामे केल्याचे फोटो टाकायची सक्ती करू नये. ५. आशांना पी.एच.सी. मध्ये सर्व सुविधा पूरविण्यात याव्या.(उदा.- रूम टेबल, स्वच्छता गृह, साहित्य इ.)६. आशांना व गटप्रवर्तकांना ऑनलाईन ची कामे सांगताना ऑनलाईन साठी लागणारे साहित्य पूरविण्यात यावे व ऑनलाईनचा मोबदला देण...

विविध नागरी समस्यांबाबत शिष्टमंडळाने केली चर्चा

इमेज
  नागरी समस्या: विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील वेगवेगळ्या नागरी सम्यस्यांबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने  नगर परिषद मुख्यधकारी त्र्यंबक कांबळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागांत सर्व मूलभूत सुविधांसह जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने आज भेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परळी शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता फळ व भाजी मार्केट एका जागेवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात जसे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स मागील जागा, खाडी नाली वरील कॉम्प्लेक्स, गोपाल टॉकीच्या पाठीमागील जागा व महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचे पुनरुज्जीवन करून या जागेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देऊन त्यांना तिथे विक्रीसाठ...

विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा

इमेज
  भाजी व फळ विक्रेते स्थलांतर प्रश्न : विविध पक्षांच्या शिष्टमंडळाचे  बाजार समितीला निवेदन  भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना सर्व सुविधायुक्त जागेत एकाच ठिकाणी बसवून नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडेंना निवेदन दिले. यावेळी 'दोन दिवसांत भाजी व फळ विक्रेते यांना सुविधा देऊन एकत्र बसवणार' असे आश्वासन सभापती सूर्यभान मुंडेंनी दिले. संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात "परळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वे नं - 499 या जागेत बसवले आहे.फळ विक्रेत्यांना मात्र मोंढा मार्केट मध्येच बसवले आहे. भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते हे एकाच ठिकाणी अ...
इमेज
वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा 65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्वासन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....तालुक्यातील वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा वारसाहक्काने जमीनी नावावर करण्याचा  65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू असे अश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.        वसंतनगर तांडा येथील गट क्र 478/466/ 468/469 मधील जमीनी वारसाच्या नावे होणे बाबत निवेदन देण्यात आले असुन जिल्हाधिकारी पत्र क्र-93/आर बी/ एल एन डी/1-59 जिल्हाधिकार्यालय बीड दि.13-11-2003 च्या पत्रा आधारे या जमीनीवर वारसांची नावे लावावीत अशी मागणी आहे. सर्व 48 सभासद वसंत नगर तांडा तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी असून प्रत्येक कुटुंबास दहा (10) एकर याप्रमाणे 48 कुटुंबांना जमीन मिळालेली आहे त्या जमिनीच्या आदेश क्र.93 वाटप सन 1961-62 या वर्षात मिळाली असून आज रोजी 48 सभासदांपैकी 90 टक्के सभासद मयत असून सदरील जमीन ही कायद्याने आम्ही वारस आहोत तरी सदरील जमिनी ही वारसा लावून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दे...

स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा

इमेज
 स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा परळी वैजनाथ,प्रतिनिधी..... माजी नगराध्यक्ष, भाजपा जेष्ठ नेते स्व. अशोक सामत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्ताने गणेशपार येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.            स्व अशोक सामत म्हणजे, शहरातील सर्व घटकांना एकत्रित करून, समाजकारण, राजकारण करणारे व्यक्तीमत्व होते, त्यांनी नेहमीच पक्षविरहित मानवतावादी दृष्टिकोन ठेवून राजकारण केले,त्यामुळे आज देखील त्यांचे नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, असे गौरवोद्घार श्री वैद्यनाथ देवस्थानचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी केले. जेष्ठ नेते दतप्पा इटके गुरुजी यांनी स्व अशोक सामत यांच्या सोबतच्या कारकिर्दीवर संक्षिप्त दृष्टिकोनातून आठवणीला उजाळा दिला. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे नेते अब्दुल करीम यांनी आपल्याला स्व. सामत यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याची आठवण सांगितली. भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी स्व. अशोकसेठ सामत यांच्याकडून  विविध अडचणीत मोलाची मदत झाल्याचे सांगितले. ...