मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य प्रतिनिधी परळी वैजनाथ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी (दि.१२) सप्टेंबर रोजी उपरोक्त मत व्यक्त केले. शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर येथील इतिहास तज्ञ प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये झालेले अन्याय, अत्याचार, सामाजिक परिस्थिती व त्यामध्ये मराठवाड्यातील सामाजिक ऐक्य, तत्कालीन काळातील परिस्थिती त्यातून समाजाला मिळालेले संस्कार , दिलेला लढा व सामाजिक एकोपा याच...