महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातही डंका : 6 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड परळी / प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील व ग्रामीण भागातील नावाजलेली संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 6 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेले 6 विद्यार्थिनी हे राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. ग्रामीण भागातील सर्वात जुनी व नावाजलेली शिक्षण संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून एस.एस.सी, एच.एस.सी बोर्ड परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यासह सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा,संस्था म्हणून सर्वदूर परिचित आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शालेय विद्यार्थिनी यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा पातळीवर आपली छाप निर्माण केली. संपन्न झालेल्य...