पोस्ट्स

अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती

इमेज
  सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्गमित्रचे स्नेह मिलन उत्साहात  अमेरिकेत असलेल्या वर्गमित्रांची उपस्थिती परळी/प्रतिनिधी      परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्राचे ४२ वर्षांनंतर झाले स्नेह मिलन. दोन दिवस निवासी झालेल्या कार्यक्रमात सगळ्या वर्गमित्रांणी सहकुटुंब सहभाग घेतला. मराठवाडा साथीचे संपादक व बंसल क्लासेस महाराष्ट्रचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून चौथ्यांदा स्नेहमिलन चा कार्यक्रम झाला. परभणीपासून जवळच असलेल्या कोकोनट रिसोर्टमध्ये दोन दिवस स्वतःची सर्व कामे सोडुन मुक्कामी राहुन एकमेकांच्या कुटुंबीयांची ओळख व माहीती जाणुन घेतली. दिनांक २८ व २९ नोव्हेंबर हे दोन दिवस श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांची निवासी व्यवस्था करण्यात आली होती. बालपण एकत्र घालविलेले वर्गमित्र सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले ४२ वर्षांनंतर एकत्र आल्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सर्व वर्गमित्रांणी एकत्र येत साजरी केली. परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील १९८१ बॅचच्या वर्गमित्रांचे हे ...

प्रसिद्ध गायक राजेश भावसार व पार्श्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम

इमेज
  मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने रविवारी दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध गायक राजेश भावसार व पार्श्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम परळी/प्रतिनिधी      मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी निमित्त पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २१ वर्षांपासून दिवाळी आणि पहाट गाणी हे शहरातील गीत संगीत रसिकांचे एक समिकरण ठरलेले आहे. परळी शहरातील नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृहात रविवार (ता.१२) पहाटे ५:३० वाजता दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी परळी शहरातील खास रसिकांसाठी स्वरमिलाफ ऑर्केस्ट्रा चे सादरीकरण होणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध गायक व संगीतराज म्युझिक ग्रुप व कॉन्सर्ट चे राजेश भावसार व पाश्व गायीका संगीता भावसार यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दिवाळी निमित्त पहाटेची भक्तिगीते, जुने-नवे मराठी व हिंदी अविट गोडीची गाणी असणार आहेत. तसेच कानाला तृप्त करणारं सुश्राव्य संगीताची मेजवानी परळीकरांसाठी असणार आहे. या कार्यक्रमास शहरातील र...

उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती

इमेज
  उखळी बु.येथे पोस्टाचा मेळावा: विविध योजनांची दिली माहिती सोनपेठ, प्रतिनिधी.....        डाक समुह विकास कार्यक्रमाचे अंतर्गत आज (दि.४) उखळी बु. येथे पोस्ट खात्याच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालय येथे  हा मेळावा आयोजीत करणात आला.कार्यक्र‌मास सरपंच श्री.सावंत यांनी उपस्थित राहून जनतेस जास्तीत जास्त खाती काढण्याचे आवाहन केले.           यावेळी साहाय्यक अधिक्षक डाकघर परभणी श्री व्हि. यु. कुलकर्णी यांनी पोष्टखात्याच्या विविध योजनांची माहिती व फायदे समजावून सांगीतले. विशेषतः इंडिया पोष्ट पेमेंट बँक मार्फत दिल्या जाणार्‍या 399 रुपयात रु. 10 लाखाचा विमा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, किसान सन्मान योजना व इतर  शासकीय योजनांचे डिबीटी मार्फत येणारे अनुदान गावातले गावात मिळावे यासाठी पोष्ट बँकेचे खाती उघडण्याचे आवाहन करण्यात आले.         हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी श्री. कृष्णा मुंढे, श्रीहरि लोखंडे, श्री.साळवे, श्री. बचाटे, श्री सिरसाट आदींनी प्रयत्...

मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे:4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर

इमेज
  मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीरे: 4 नोव्हेंबर रोजी होणार पहिले शिबीर बीड, दि. 03 (जि. मा. का.) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच मतदान नोंदणीचे मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.             या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक मतदारांनी त्यांची मतदान नोंदणी करून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे दि. 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार) दि. 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) दि. 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) आणि दि. 26 नोव्हेंबर 2023 (रविवार) या चार दिवशी बीड जिल्ह्यातील 228- गेवराई,  229-माजलगाव, 230- बीड, 231- आष्टी, 232- केज व 233- परळी एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून सर्व मतदारांनी मतदा...

किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा

इमेज
  बीड जिल्ह्यातील मुलीं आता खेळणार  'थ्रोबॉल' किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा बीड, दि. 03 (जि. मा. का.) :-बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामधील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार. किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी थ्रोबॉल आणि जाळी (नेट) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या सुपूर्त केले. बालविवाहाला नकार देण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता अकरा तालुक्यातील 125 शाळांमध्ये मुली थ्रोबॉल खेळणार.रत्नदीप चॅरिटी ट्रस्टचे राजीव मेहता यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना थ्रोबॉल आणि जाळी (नेट ) भेट स्वरूपात देण्यात आले.  हे थ्रो बॉल आणि नेट जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना शाळेतील  विद्यार्थिनींना थ्रोबॉल खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून त्यांच्या सुपूर्त केले.  युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन (एसबीसी थ्री) या आंतरराष्ट्रीय...

सत्कार

इमेज
  दिव्यांगची सेवा करण्याची संधी मिळाली- डॉ.संतोष मुंडे सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे आणि आ. बच्चू कडू यांनी दिलेल्या संधीमुळे दिव्यांगची सेवा करण्याची मला संधी मिळाल्याचे महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे नवनिर्वाचित सदस्य डॉ.संतोष मुंडे यांनी म्हटले आहे.      दिव्यांग विभागाच्या राज्य सदस्य पदे त्यांची निवड झाल्याबद्दल सुरेश नाना फड व प्रदीप खाडे यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी सुरेश (नाना) फड, बालाजी फड,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे, माजी सरपंच हरिष नागरगोजे, पत्रकार रणबा गायकवाड, भक्तराम फड, मगन वसावे, आधळे सर व इतर उपस्थिती होते.

दुर्देवी: आपघातात एकाने प्राण गमावले

इमेज
  परळी ते मांडेखेल रस्त्यावर अज्ञात वाहनाने उडवले: ॲड. संदीप रूपनर यांचे अपघाती निधन अंबाजोगाई - भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अंबाजोगाई न्यायालयातील ॲड. संदीप नवनाथ रुपनर (वय २४, रा. ममदापुर, ता. परळी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी (दि.०३) दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडेखेल शिवारात झाला. ॲड. संदीप रुपनर यांनी सामान्य परिस्थितीतून पुढे येत वकिलीचे शिक्षण घेतले. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कार्य पद्धतीमुळे वकिली क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. ते शुक्रवारी दुपारी परळी न्यायालयातील कामकाज आटोपून अंबाजोगाई न्यायालयात येण्यासाठी निघाले होते. मार्गात मांडेखेल शिवारात समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अनेक वकील बांधवानी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. ऍड. संदीप रुपनर यांच्या मृत्यूमुळे एक उमदा तरुण सहकारी गमावला अशी भावना वकील संघाकडून व्यक्त होत आहे. ◇◇◇◇◇