पोस्ट्स

अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

इमेज
  अभयकुमार ठक्कर व प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड परळी/प्रतिनिधी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक शिवसेना नेते अभयकुमार उर्फ पप्प्पूअण्णा ठक्कर व प्रमुख मार्गदर्शक युवा नेते प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 16 मार्च रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणी :-कार्याध्यक्ष बबन ढेंबरे, उपाध्यक्ष - किशन बुंदेले, अमित कचरे, सचिव - मनीष जोशी, सह सचिव - बजरंग औटी, कोषाध्यक्ष - योगेश घेवारे, सह कोषाध्यक्ष - सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, संघटक - योगेश जाधव, सह संघटक - लक्ष्मण मुंडे, प्रकाश देवकर, प्रसिद्धी प्रमुख - माऊली मुंडे, सह प्रसिद्धी...

बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा

इमेज
  अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल रोजी पाठक मंगल कार्यालयात भव्यदिव्य सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा बीड दि.१७ (प्रतिनिधी):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने चैत्र कृ.४ रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी पाठक मंगल कार्यालय नगर रोड ,बीड येथे सकाळी ठिक ११.३१ वा. या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य, विधिवत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास संत, महंत, वेदमूर्ती, प्रतिष्ठित मान्यवर, महिला पुरुष समाजबांधवाचे मौज सोहळ्यास आशीर्वाद लाभणार आहेत. या संस्कार सोहळ्यत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा उपनयन संस्कार करावयाचा आहे अशा इच्छुक पालकांनी त्वरीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क ॳॅड.रविंद्र सुधाकरराव देशमुख मो.क्र. ९४२२३३२०५३, ॳॅड.समीर चंद्रशेखरराव पाटोदकर मो.क्र. ९८५०५९०६५६, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी मो.क्र.९२२६८७५६७०, बाळासाहेब जोशी (खडकीकर) मो.क्र.९४२१२७७८२४, नितीशकुमार कुलकर्णी मो.क्र.९८६०७७७५७२ या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाह...

कार्यक्रमांच्या आयोजनांवर राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी

इमेज
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म आणि भाषावार कार्यक्रमांच्या आयोजनांवर  राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी बीड, दि. 16 मार्च (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर  केला आहे. आजपासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आली असल्याची माहिती पत्रकारद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी कळविली आहे.  जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक  आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील.   प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी कर...

कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय

इमेज
  अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालयात वसतिगृह बांधकामास 14 कोटी 87 लाख, तर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी 5 कोटी 48 लाख निधी मंजूर कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय मुंबई (दि.16) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामास 14 कोटी 87 लाख रुपये तसेच अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 5 कोटी 48 लाख रुपये असे एकूण 35 कोटी 22 लाख रुपये निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनीही  याबाबत मागणी व पाठपुरावा केला होता.   दोन्ही कामांसाठी एकूण 35 कोटी 22 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला असून या दोन्ही वसतीगृहांच्या कामांमुळे येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.  धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून, कृषी विभागाच्या माध्यमातून देखील जिल्ह्यासाठी कृष...

केंद्र सरकारने ॲड दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

इमेज
  केंद्र सरकारने ॲड. दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)          येथील न्यायालयात  वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड दत्तात्रय आंधळे यांची केंद्र सरकारने नोटरी वकील म्हणून नियुक्ती केले बद्दल त्यांचा हृदय सत्कार परळी येथील मोंढा मार्केट मधील आडत व्यापारी श्री नामदेवराव वसंतराव गित्ते यांचे तर्फे करण्यात आला.            यावेळी आडत व्यापारी श्री लक्ष्मण बाबुराव मुंडे सोनहिवरेकर,आडत व्यापारी श्री रामराव अशोक गित्ते,श्री सूर्यकांतराव गुट्टे हाळम, श्री अनिल कदम ,माऊली फड नंदागौळ, हरिभाऊ कराड, सुभाषराव कराड, श्री माऊली गुट्टे, सिध्देश्वर रायभोळे आदींनी ॲड दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार केला.

शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव

इमेज
  शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव .......... नांदेड दिनांक 15 मार्च प्रतिनिधी शृंगेरीच्या श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महास्थान दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ यांच्याकडून नांदेड येथील सौ. अनिता अनिलराव नेरलकर ( आशा प्रभाकरराव चाटूफळे ) यांना श्रीमदभगवतगीतेतील संपूर्ण 18 अध्याय व 700 श्लोक मुखोद्ग्त करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोख एकवीस हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. श्री श्री विदुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सौ. अनिता नेरलकर यांनी आजपर्यंत पाचशेहून अधिक भाविकांना गीतेची संथा व अर्थासहित पाठांतर करून घेतले आहे. तसेच शंभरहून अधिक भाविकांना विष्णुसहस्त्रनाम अर्थासहित संथा देऊन पाठांतर करून घेतले आहे. पुणे येथील गीता धर्म मंडळाद्वारे पाच वर्षापासून भगवद्गीतेचे पाठांतर व संथा देण्याचे त्या ऑनलाइन द्वारे अध्यापनाचे कार्य करतात. तसेच योग विद्याधाम नाशिकच्या नांदेड शाखेच्या त्या उपाध्यक्षा व प्राध्यपिका असून प्रवेश परिचय, प्रबोध य...

ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य विषयक प्रबोधन

इमेज
◆आध्यात्मिक चळवळीला नवी दिशा देणारा:शेतकरी कीर्तन महोत्सव 21 मार्चला प्रारंभ परळी / प्रतिनिधी कीर्तन परंपरेतून आलेले ज्ञान,  आधुनिक जगातील विज्ञान आणि वैद्यकीय अभ्यासातून घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत प्रबोधन करणारा दुसरा कीर्तन महोत्सव 21 मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत संजय आवटे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून 21 गावांनी एकत्र येऊन तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती या सोहळ्याचे संकल्पक शेतकरी नेते एड. अजय बुरांडे यांनी दिली. शेतकरी वर्गाला केंद्र स्थानी ठेऊन आयोजिलेल्या या कीर्तन महोत्सवात कोणत्याही प्रकारचा झगमगाट न करता प्रबोधनाला प्राधान्य दिले जाते. या वर्षी या कीर्तन महोत्सवात शेतकरी आरोग्याला प्राधान्य दिले असून दर दिवशी एका आजारावर आरोग्य शिबीर आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.  या कीर्तन महोत्सवात नेत्रर...