पोस्ट्स

चेअरमन विनोद सामत यांना वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद

इमेज
  वैद्यनाथ अर्बन बँकेची राज्यभरात  भरभराट होईल- नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अव्वल असलेल्या  परळीच्या वैद्यनाथ अर्बन बँकेने सभासद , खातेदार व ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या  नेतृत्वाने , व चेअरमन संचालक मंडळ ,अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे वैद्यनाथ अर्बन बँक राज्यात अग्रेसर असून या बँकेची प्रगती यापुढे होणार आहे असा आशीर्वाद सोनपेठ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी दिले. सामान्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी या बँकेने प्रयत्न केले आहे यापुढे करावेत अशी अपेक्षा ही शिवाचार्य महाराजांनी व्यक्त केली.                                          श्री  नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी शनिवारी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या मुख्य शाखेस भेट दिली याप्रसं...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाया

इमेज
  परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! कोम्बिग ऑपरेशन राबवत फरार 18 आरोपी ताब्यात;तीन तलवारी जप्त  परळी (प्रतिनिधी)  परळी शहर,संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने शुक्रवारी (दि.5 एप्रिल) रात्री लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात गस्त घालुन ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.यामध्ये विविध गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या 18 आरोपींना ताब्यात घेण्याबरोबरच तीन तलवारी व हातभट्टी दारु अड्डयावर छापा टाकत गुन्हे दाखल केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी पोलिस ॲक्शन मोडमध्ये असुन शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत परळी शहरासह तालुक्यात पोलिस उपाधिक्षक चोरमले,परळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि.संजय लोहकरे,संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोनि उस्मान शेख,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि मनिष पाटिल यांच्यासह 23 कर्मचारी व आरसीपी ची एक प्लॅटुन अशा फोजफाट्यासह संयुक्त कारवाई करण्यात आली.यात  विविध गंभीर गुन्ह्यातील दोन वर्षांपासुन फरार असलेल्या 18 आरोपीसह टोकवाडी,फुलेनगर या भागातुन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.गंगासागर नगर भागात सुरु असलेल्या हातभट्टी अड्डयावर छ...

नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय

इमेज
शाळकरी मुलींची छेड प्रकरण ;दोन जण सिरसाळा पोलीसांच्या ताब्यात  नारायण गडावरील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला होता विषय  सिरसाळा  :  शाळेत जात येत असलेल्या मुलीला रस्त्यात गाठून छेड काढणाऱ्या करेवाडीच्या  दोन रोमिओंना सिरसाळा पोलीसांनी आज (दि. ६ एप्रिल) रोजी ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावरती कलम ३५४,३४१ भादवी व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ एप्रिल रोजी घडल्याचे समजते आहे. काल मनोज जरांगे पाटील यांनी  नारायणगड येथे मराठा समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत छेडछाडीचा विषय मांडला होता .          परळी तालुक्यात माझ्या समाजाच्या मुलींना त्रास दिला जातो, अन्याय केला जातो असे म्हणत या प्रकरणी पालकमंत्री यांनी लक्ष द्यायला हवे अन्यथा आम्ही परळीत घुसू असे जरांगे पाटिल यांनी वक्तव्य केले होते. यानंतर ह्या घटनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सिरसाळा पोलीसांनी दोन आरोपींना आज ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक गोरखनाथ दह...

बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद

इमेज
  गोंधळी, धनगर, बंजारा, भिल्ल समाजासह अठरापगड जातीची मिळतेयं पंकजाताई मुंडेंना साथ बीडच्या बैठकीत समाजातील कार्यकर्त्यांनी दिली एकमुखी पसंती सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडेच बीड ।दिनांक ०५। बीड जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या अभूतपूर्व विकास कामांमुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना अनेक सामाजिक घटक आणि राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळतो आहे. बीड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरीअर्सच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बीड तालुक्यातील गोंधळी समाज,धनगर समाज, बंजारा समाज, भिल्ल समाज आणि लोक कलावंत जिल्हा संघटनेने पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व समाज घटकांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. आगामी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने पंकजाताईंच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभे करून त्यांना विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवण्याचा संकल्प केला, याप्रसंगी पंकजाताई मुंडे या...

तुम्ही बुथ मजबुत करा, मी जिल्हा मजबूत करते

इमेज
  बीडमध्ये भाजपा महायुतीचे जिल्हा प्रचार कार्यालय ; पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन बूथ प्रमुखांसह सुपर वॉरियर्स सोबत पंकजाताईंनी घेतली बैठक बीड ।दिनांक ०५। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बीड येथील जिल्हा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज  भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात झाले. खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह महायुतीचे सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.  बीड शहरातील जालना रोडवरील संचेती बिल्डींग, एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर, भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. आता या ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने काम केले जाणार आहे. दुपारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.    पकार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी  खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग...

परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल

इमेज
  परळीत आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शाळकरी मुलींच्या अपहरणाच्या घटनाही घडलेल्या आहेत महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दररोज पोलीस ठाण्यात नोंद होताना दिसून येत आहे आज पुन्हा एकदा एका महिलेने आपल्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार करण्यात आले व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या आशियाची फिर्याद दाखल केल्यावरून एका जणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, शहरातील शिवनगर, वडर कॉलनी  येथील मोलमजुरी करणाऱ्या एका गृहिणीने आपल्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याची फिर्यादी पोलिसात दाखल केली आहे.यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकाना ओळखत असून आरोपी व फिर्यादी अधून-मधून बोलत असत. नंतर आरोपी हा फिर्यादीस मला तूझ्या सोबत शारीरीक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणत असे, नकार दिल्यास तूझ्या मूलांना मारून टाकीन अशी धमकी देवू लागला, त्यानंतर दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास फिर्यादी घरी एकटीच असताना आर...

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे

इमेज
  राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, बीडमधून पुन्हा बजरंग सोनवणे मुंबई  : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भिवंडीवर काँग्रेसने अखेरपर्यंत दावा करूनही ही जागा मिळविण्यात शरद पवार गटाने बाजी मारली. या जागेवरून बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे दोन हात करतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. गुरुवारी पक्षाने दुसरी यादी जाहीर केलेली असून बीड आणि भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने याआधी पहिल्या उमेदवारी यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली होती. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिलेली होती. गुरूवारी पक्षाने आणखी दोन उम...