अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी... एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, नागसेननगर परळी वै येथील फिर्यादीकडे त्याची भोसरी पुणे येथील १४ वर्षीय भाच्ची आलेली होती.तीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले आहे. या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुरन. 67/2024 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.