पोस्ट्स

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

इमेज
  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार परळी वैजनाथ:सरस्वती नदीच्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातूनच होत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही तातडीने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन दिलासा दिला होता. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या भागात फिरून तातडीने मदतीची मागणी केली होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या पूरग्रस्त नागरिकांना नाथ प्रतिष्ठानकडून 10 व शासकीय मदत पाच हजार अशी पंधरा हजार रुपयाची  मदत जाहीर केली. याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करून नाथ प्रतिष्ठानचेही कौतुक केले आहे.  परळी शहरातील सरस्वती पाणी वस्त्यातील घरामध्ये शिरल्याने प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते .कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी तर केली पण अजून ही तातडीची मदत केली नसल्याचे सांगुन गणेश उत्सवाच्या काळात तात्काळ मदत करायला हवी. पूरग्रस्ता...

वीस वर्षीय युवतीचा विनयभंग

इमेज
  वीस वर्षीय युवतीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर शिक्षण घेत असलेल्या केज तालुक्यातील वीस वर्षीय युवतीचा भावकीतील एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी घडली.  केज तालुक्यातील वीस वर्षीय युवती परळी बसस्थानकासमोरील समर्थ हॉस्पिटल येथुन शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वैद्यनाथ हॉस्टेलकडे निघाली असता चंद्रमणी आश्रोबा तुपारे याने रस्त्यात अडवून तु माझ्याशी लग्न कर अशी हुज्जत घालू लागला.सदरील युवतीने नकार देताच शिवीगाळ करत मारहाण करुन विनयभंग केला.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

इमेज
परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील परळी (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, रॅली, काढलेल्या आपण पाहिलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात घोंगडी बैठकांचे आयोजन केलेले आहे. याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक परळी मतदार संघात होणार आहे. आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार आहे. बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार केले आहे. परळी वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या हालगे गार्डन परळी विधानसभा मतदार संघाची भव्य दिव्य अशी घोंगडी बैठक मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. सरकारने लगेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदव...

प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार

इमेज
  परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या 550 हुन अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी 10 हजारांची मदत तातडीच्या आपत्ती निधीतूनही प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 5 हजारांची मदत; रविवारी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत एकत्रित होणार वितरण प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार परळी वैद्यनाथ (दि.07) - परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने या प्रत्येक बाधित कुटुंबाला नियमाप्रमाणे प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे तातडीची मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व...

केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेली प्रत्येक स्वप्न सरकारी योजना बनवल्या केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले अहिल्यानगरच्या राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे आ. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेकांची उपस्थिती शिर्डी ।दिनांक ०६।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेसाठी जी  स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नांच्या मी मंत्री असताना सरकारी योजना तयार केल्या आणि त्यातून विकासाची कामे मार्गी लावली. आम्ही केवळ नवीन इमारती बांधल्या नाहीत तर शासकीय योजनांच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडण्याचे काम केले, जनसेवेचे हा वसा कधीही सोडणार नाही असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.     सात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तर प्रमुख पाहुणे ...

मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

इमेज
  नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवातील श्रींची सकाळी 11 वाजता निघणार मिरवणूक मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा परळी वैजनाथ: नाथ प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या 19 व्या वर्षीच्या महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन संपन्न होत असून तत्पूर्वी सकाळी ठीक अकरा वाजता श्रींची हनुमान मंदिर येथून स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडप जत्रा मैदान इथपर्यंत मिरवणूक निघणार आहे.  या मिरवणुकीनंतर स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडपाच्या बाजूस उभारण्यात आलेल्या खास शामियानामध्ये श्रींची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. परळी शहरातील प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे डॉ.गुरुप्रसाद देशपांडे , डॉ.सतीश गुठे डॉ.सुरेश चौधरी भिकूलालजी भन्साळी या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी

इमेज
  धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास आज परळीत येणार कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी परळी वैद्यनाथ (दि. 06) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात आजपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.  आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवात होईल.  या गणेश महोत्स...