युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील


परळी (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, रॅली, काढलेल्या आपण पाहिलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात घोंगडी बैठकांचे आयोजन केलेले आहे. याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक परळी मतदार संघात होणार आहे. आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार आहे. बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार केले आहे.



परळी वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या हालगे गार्डन परळी विधानसभा मतदार संघाची भव्य दिव्य अशी घोंगडी बैठक मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. सरकारने लगेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदवार पाडणार की उभे करणार यावरही आपली भूमिका यामधून स्पष्ट करणार आहेत. तरी या बैठकीस परळी विधानसभा मतदार संघातील मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या