पोस्ट्स

कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

इमेज
सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार मुंबई दि.१३- सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.      राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्...

निकटवर्तीयांना चुटपुट लावणारी ह्रदयद्रावक घटना

इमेज
आईच्या दहाव्या दिवशी मुलाचीही संपली जीवनयात्रा ! परळी/प्रतिनिधी - आईच्या दहाव्या दिवशीच मुलाचेही निधन झाल्याची चुटपूट लावणारी एक घटना परळीच्या संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी घडली. तारामती लक्ष्मण शिंदे (वय ८०) व बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५३), असे निधन झालेल्या माय-लेकराचे नाव आहे. बालाजी शिंदे हे गणेशपार भागात *बम्बईया* या टोपण नावाने परिचित होते. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते व्यवसाय करत होते. ऊन-पाऊस अथवा कितीही कडाक्याची थंडीही असली तरी पहाटे ५ वाजून ५ मिनिटाला शिंदे यांचा ऑटो सुरू व्हायचा. तीच त्यांची ओळख गल्लीतील रहिवाशांमध्ये ठसलेली होती. ऑटो चालवूनच त्यांनी मुलाला इंजिनिअर केले. मुलीलाही उच्चशिक्षित केले. बालाजी शिंदे हे ४ सप्टेंबरला वार्धक्याने इहलोकीची यात्रा संपवलेल्या आईच्या गंगापूजनाचे विधी १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची सर्व तयारी घरात करत होते. १४ व्या चा गोड जेवणाचा मुख्य विधी सावता महाराज मंदिरात करायचे निश्चित झाले होते. तसे स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप...
इमेज
  परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह परळी वैजनाथ ,प्रतिनिधी          परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन  या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.            एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इमेज
  धर्मापुरीकरांना दिलेला शब्द धनंजय मुंडेंनी केला पूर्ण, शादीखाना बांधकामास 1 कोटी रुपये निधी मंजूर परळी वैद्यनाथ (दि. 13) - परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील धर्मापुरी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, धर्मापुरी येथे शादीखाना उभारण्यास शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने मंजुरी दिली असून, मुंडेंच्या मागणीनुसार या कामासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात दिलेले शब्द पूर्ण करण्यावर व पायाभूत सुविधांच्या निर्माणवर अगदी सुरुवातीपासूनच भर दिला आहे.  मागील सुमारे पावणे पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकास, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पशु वैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध सुविधा, राष्ट्रीय महामार्गाचे नावन्यपूर्ण निर्माण, शहर बायपास यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यातच आता दिलेला शब्द पूर्ण करत धर्मापुरी येथील शादीखान्याचीही भर पडली आहे.  याबद्दल धर्मापुरीचे ज्येष्ठ न...

अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

इमेज
अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      श्री क्षेत्र हनुमान मंदीर अंबलटेक, अंबाजोगाई, जि. बीड येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.              गुरुवार, दि.१२.०९.२०२४ रोजी प्रारंभ होणार असुन बुधवार, दि.१८.०९.२०२४ कथेची सांगता होणार आहे.दररोज सायं. ७.०० ते १० पर्यंत कथेची वेळ असणार आहे.कथाकार श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या सुमधूर वाणीतून कथा होईल. या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, अंबलटेक ता. अंबाजोगाई, जि. बीड यांनी केले आहे.
इमेज
  अष्टांग-योगाच्या अनुष्ठानाने जगात सुख- शांतता नांदेल ! वैद्यनाथ" मधील ‘ग्रंथ चर्चा’ उपक्रमात प्रा. डॉ.आचार्य यांचे विचार                  *परळी, दि.११-*                         सद्ययुगात वाढत चाललेल्या सर्व समस्यांवर अष्टांगयोगाचे अनुष्ठान  हाच  उपाय असून योगतत्वांच्या आचरणाने जगात सुख शांतता नांदेल.यासाठी मानवाने नेहमी योगसाधनेला जीवनाचे अंग बनवावे, असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी व्यक्त केले.                      ‌.                      येथील वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने काल (दि.१०) "ग्रंथचर्चा" हा अभिनव उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या. तर व...
इमेज
  मन, वचन व शरीराने इतरांना त्रास न देणे हा खरा यज्ञ, तर मानवाला सुखी ठेवणे हाच खरा धर्म   श्रीमद् भागवत कथेतून स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे प्रतिपादन. प्रतिनिधी । परळी दि. १२ सप्टेंबर २०२४ दृष्टी व मन शुद्ध करा. मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही. कर्म हे चित्तशुद्धी साठी आहे तर भक्ती ही मनाच्या एकाग्रतेसाठी असते. चित्त शुद्ध झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा जाणवते. ज्याचे मन निर्मळ असेल, दृष्टी शुद्ध असेल, जो निस्वार्थ मनाने कर्म करत असेल त्याच्यासाठी जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सृष्टीत वावरताना प्रत्येक जिवाला सुखी करणे हाच मानवाचा धर्म आहे. हाच आदर्श वराभ भगवंतांनी आपल्या आचरणातून मानवाला शिकवला आहे. मन, वचन व शरीराने कोणालाही त्रास न देणे हाच खरा यज्ञ आहे तर मानवाला सुखी ठेवणे हा खरा धर्म आहे असे विचार संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथाकार स्वामी डॉ.तुळशीरामजी गुट्टे महाराज यांनी तालुक्यातील नंदनंज येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या पुष्पात बोलताना मांडले. जीवनात ज्ञानाची प्राप्ती करणे ही गोष्ट कठीण नाही. ज्...