पोस्ट्स

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

इमेज
भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड  प्रतिनिधी (परळी वै.):                            येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.   ...

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेत...

बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली

इमेज
  बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली बीड।दिनांक १९। जालना ते वडीगोद्री मार्गावर मठतांडा (ता.अंबड) येथे झालेल्या  बस व ट्रकच्या भीषण अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी शोकाकुल भावना व्यक्त करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    हा अपघात अतिशय दुर्दैवी होता. यात आमचा अंत्यत धडाडीचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय बंडू बारगजे यांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. बंडू बारगजेंसह अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !! मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करते. तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना करते असं आ. पंकजाताई म्हणाल्या. ••••

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना

इमेज
  अंबड बस-ट्रक अपघाताची घटना वेदनादायी - धनंजय मुंडे जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना परळी वैजनाथ(दि. 20) - गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अंबड जवळ संत्र्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एसटी बस मधील सहा तर ट्रक मधील दोन अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  याच अपघातात आपला जुना सहकारी, बसचालक बंडू बारगजे यांचे दुःखद निधन झाले असून, त्याबद्दलही धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या एसटी बसला सकाळी नऊच्या सुमारास अंबड जवळ एका संत्र्याच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसचे चालक वाहक व अन्य चार प्रवासी तर ट्रकचा चालक व क्लीनर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 20 जण जखमी असून यापैकी नऊ जणांना प्रथमोपचार करून जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जणाची प्रकृत...

अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचेही अखंड मराठा समाजाचे आवाहन

इमेज
  जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; बीड जिल्हा बंदची हाक अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचेही अखंड मराठा समाजाचे आवाहन बीड: मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ दि.२१ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील एक वर्षांपासून घरदार सोडून लढा देत आहेत. सुरूवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. यानंतर मुंबईवर मोर्चा काढल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेचे अधिसुचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिलेला होता. तो शब्द अद्यापही पाळलेला नाही. यानंतरही उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, परंतु शब्द पाळला जात नसल्याने आता सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमा...

कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ म.गांधी जयंती दिवशी तालुकास्तरीय मेळावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे

इमेज
कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ म.गांधी जयंती दिवशी तालुकास्तरीय मेळावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे  मुंबई दि.19 : कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यातील मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदृष्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विनयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहि...

गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक

इमेज
राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन-सौ.राजश्री धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान आयोजित महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक, सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)           राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन आहे. गौरी गणपती कार्यक्रम धार्मिक आस्था नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवू शकतो असे प्रतिपादन सौ. राजश्री धनंजय मुंडे यांनी केले.          नाथ प्रतिष्ठानच्या वतीने शहरात महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले होते. यावेळी सौ. राजश्री धनंजय मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमास डाॅ. शालिनी कराड,आघाव व स्पर्धा आयोजन केलेल्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना सौ.राजश्री धनंजय मुंडे म्हणाल्या की, राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही, या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवता येते, उपेक्षित, सामाजिक घटकांसाठी काम करता येते, नाथ प्रतिष्ठ...