पोस्ट्स

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा...

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  राज्याच्या कृषी पुरस्कारांचे रविवारी मुंबईत राज्यपालांच्या हस्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई दि. 27 सप्टेंबर 2024 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5 वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  कोविड तसेच विविध कारणामुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख क...

दुःखद वार्ता:न.प.सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे निधन

इमेज
नितीन शिंदे यांना पितृशोक: न.प.सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..         परळी नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजारात निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षे वयाचे होते. युवक नेते नितीन शिंदे यांचे ते वडील होत.           परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून संपत गणपतराव शिंदे यांची ओळख होती. मध्यरात्री अडीच वाजता अल्पशा आजारातून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. युवक नेते नितीन शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर कोसळलेल्या दुखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.                  आज दुपारी अंत्यसंस्कार           दरम्यान, दिवंगत संपत शिंदे यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दिनांक 28 रोजी दुपा...

अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन...

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली उपविजेत्या

इमेज
  जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली  उपविजेत्या  परळी, प्रतिनिधी...              दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बास्केट GVबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता ठरला आहे. दिनांक 25/सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत बीड जिल्ह्यातुन 35 शाळांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत  14,17,19 वयोगटातील मुले आणि मुलींनी सहभागी झाले होते.   यात सिंदफना पब्लिक स्कूल माजलगाव ने सहभाग नोंदवून जिल्हात अंडर -14 या मुलींच्या ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या  शिक्षिका कु .संघमित्रा हुमने मॅडम यांच्या टीम ने उपविजेता क्रमांक पटकावला आहे.  या स्पर्धेसाठी जमीर सय्यद इंटरनॅशनल कोच आणि बीड जिल्हा बास्केटबॉल सेक्रेटरी बीड , क्रिडा शिक्षक संजय देशमुख सर यांनी काम पाहिले.     सर्व विजेत्यांचे  किरण गित्ते साहेब ,सचिव त्रिप...

MB NEWS:सलग 9 दिवस,423 कि.मी.86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी

इमेज
रविवार पासून सुनील गुट्टेंची परळी मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा  सलग 9 दिवस, 9 मुक्काम, 423 कि.मी.प्रवास व 86 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घेणार भेटी परळी, प्रतिनिधी...         परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते सुनील गुट्टे हे परळी मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा करणार आहेत. रविवार दि.29 सप्टेंबर ते 9 आँक्टोंबर दरम्यान यक संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.          युवानेते सुनील गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील डिग्रस येथून या शेतकरी संवाद यात्रेला रविवार दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी प्रारंभ होणार असुन 9 आँक्टोंबर रोजी परळी येथील प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा जवळपास पुर्ण परळी विधानसभा मतदारसंघात जाणार आहे.            सलग 9 दिवस,9 मुक्काम,86 गावे,423 कि.मी.अंतर कापत या शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधणार आह...
इमेज
  दुःखद बातमी: वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे निधन  परळी, प्रतिनिधी  परळी येथील बँकनी कॉलनी भागातील रहिवाशी असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत वय 75 यांचे आज दि.26 गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,नरेंद्र भागवत आणि मनोज भागवत अशी दोन मुले,दोन मुली भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे. आज संध्याकाळी 8:30वाजता परळी येथील अमर धाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. परळी शहरातील बँकिंग व्यवसायातील शांत, मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक शिंपी समाजाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नामदेवराव भागवत हे परिचित होते.नाथ चित्र मंदिर जवळ असलेल्या भागवत पॅलेस व भागवत मंगल कार्यालय याचे नरेंद्र भागवत मनोज भागवत यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज दि.26 गुरुवार रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर बँक कॉलनी येथून निघणार आहे. सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिच...