इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 दुःखद बातमी: वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे निधन




 परळी, प्रतिनिधी 


परळी येथील बँकनी कॉलनी भागातील रहिवाशी असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत वय 75 यांचे आज दि.26 गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,नरेंद्र भागवत आणि मनोज भागवत अशी दोन मुले,दोन मुली भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.


आज संध्याकाळी 8:30वाजता परळी येथील अमर धाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.


परळी शहरातील बँकिंग व्यवसायातील शांत, मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक शिंपी समाजाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी म्हणून नामदेवराव भागवत हे परिचित होते.नाथ चित्र मंदिर जवळ असलेल्या भागवत पॅलेस व भागवत मंगल कार्यालय याचे नरेंद्र भागवत मनोज भागवत यांचे ते वडील होत.

त्यांच्या पार्थिवावर आज दि.26 गुरुवार रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर बँक कॉलनी येथून निघणार आहे.


सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिचित असलेले वैद्यनाथ बँकेचे सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत भागवत साहेब म्हणून सर्वांना सुपरिचित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या