पोस्ट्स

सोमवारी माजलगाव शहर बंद चे अवाहन

इमेज
  चिमुरडीवर अत्याचार :नराधम शिक्षकास अटक :४ दिवसाची पोलिस कोठडी  सोमवारी माजलगाव शहर बंद चे अवाहन  ---------------------------------------- माजलगाव दि.६(प्रतिनिधी)-दोन दिवसापूर्वी येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली व आरोपीस माजलगाव न्यायालयासमोर हजर केले असता ४दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.    राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या  घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली.या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला.तर शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.        माजलगाव शहरात एका  शाळेत बालवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले मुली दररोज येतात या परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने दि .२५ ते २८ सप्टेंबर रोजी डबा खाल्यानंतर अत्याचार केला.

मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांची घेतली भेट

इमेज
  बीडच्या जिल्हा परिषद आवारात मराठा आरक्षण प्रश्नावर तरुणाची आत्महत्या  मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांची घेतली भेट  बीड  : मराठा आरक्षण मिळत नसल्याने नायगाव येथील एका तरुणांनी बीडच्या जिल्हा परिषद आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. अर्जुन कवठेकर असे या तरुणाचे नाव आहे.  अर्जुन कवठेकर हे ट्रॅव्हलस चालक असून सकाळी ते जिल्हा परिषद आवारात आले होते. या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान याबतची माहिती मनोज जरंगे पाटील यांना मिळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात कवठेकर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी मराठा बांधवांनी आत्महत्या करू नयेत, आपण आरक्षण मिळवणारच आहोत असे म्हंटले आहे.
इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

डॉ. फुलचंद मुंदडा यांचे निधन

इमेज
  महेश बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. फुलचंद  मुंदडा यांचे निधन परळी /प्रतिनिधी -शहरातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फुलचंदजी मुंदडा यांचे आज दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने  निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्यावर परळी वैजनाथ येथे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता राजस्थानी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. बँकेच्या स्थापनेपासून तहयात त्यांनी अध्यक्षपद  भूषवले होते .

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

इमेज
जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळ स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जैन समाज समाज आथिर्क विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला,या सोबतच लोणारी,बारी आणि हिंदू खाटीक समाजासाठी देखील आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत घेण्यात आलेले शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत. o राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ( महसूल विभाग) o महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग) o दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग) o त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग) o टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव ( जलसंपदा विभाग) o पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार सिल्लोड मधील जमिनीला सिंचन (जलसंपदा विभाग) o प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद (पर्यटन) o राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली (क्रीडा विभाग) o राज्

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एका स्वप्नपूर्तीत माझा वाटा आहे, याचा आनंद वाटतो - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांसाठी 'संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा' योजना लागू मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एका स्वप्नपूर्तीत माझा वाटा आहे, याचा आनंद वाटतो - धनंजय मुंडे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मुंडेंनी मानले आभार मुंबई (दि. 04) - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजना प्रस्तावित केली होती, त्या योजनेस आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच सुमारे दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच आज झालेल्या निर्णयानुसार लागू करण्यात येत असून या योजनेचा संपूर्ण खर्च स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड का