इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सोमवारी माजलगाव शहर बंद चे अवाहन

 चिमुरडीवर अत्याचार :नराधम शिक्षकास अटक :४ दिवसाची पोलिस कोठडी

 सोमवारी माजलगाव शहर बंद चे अवाहन 

----------------------------------------

माजलगाव दि.६(प्रतिनिधी)-दोन दिवसापूर्वी येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली व आरोपीस माजलगाव न्यायालयासमोर हजर केले असता ४दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

   राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या  घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली.या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला.तर शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

       माजलगाव शहरात एका  शाळेत बालवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले मुली दररोज येतात या परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने दि .२५ ते २८ सप्टेंबर रोजी डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी  ताप येऊन आजारी पडली त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यात आले.घरी आल्यावर तिने शाळेत झालेली ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली.पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते असेही सांगितले. या घटनेनंतर चिमूरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गून्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदरील अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली तर या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचे सह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्ही ची तपासणी केली तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली तसेच शिक्षकांच्या फोटो मधून सदरील चिमुरडीने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी संबंधित नराधाम शिक्षकास अटक केली आहे.सदरील आरोपीस माजलगाव न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपी नराधाम शिक्षकास ४ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

      तर या प्रकरणी लहान चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे माजलगावात तिव्र पडसाद उमटत  असतानाच उद्या माजलगाव बंद चे अहवान करणार असल्याचे निवेदन माजलगाव शहर पोलिसांत दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या