● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

परळी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार मैदानात: निवडणुकीत दोन राजेसाहेब देशमुख परळी वैजनाथ, प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारी अर्जांपैकी केवळ अकरा अर्जाच शिल्लक राहिले आहेत. प्रबळ दावेदार प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाची लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट होणार आहे. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली यादरम्यान वै ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे आता ...