इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

मी राजकारणात नाही; मी आणि माझे आंदोलन

मनोज जरांगेंची निवडणुकीतून सपशेल माघार



मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल(दि.३) कोण-कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. तसेच,  कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. 

मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४)  केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक घेतली. 


मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४) केले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिवसभरात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक घेतली. 

मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत २५ मतदार संघावर चर्चा करण्यात आली. रात्री १४ मतदार संघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित मित्रपक्षातील उमदेवार देण्यावर चर्चा करण्यात आली. सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची, एका जातीवर निवडणूक लढायची का यावर चर्चा करण्यात आली. परंतु, मित्रपक्षाची यादी सकाळी ९ वाजले तरी आलेली नाही. 


यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाच्या जिवावर निवडणूक लढविता येत नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही. त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदार संघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून 'मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे', असे लिहून घ्या, असे आवाहन केले. आम्ही निवडणुकीत असलो तरी समोरच्याचा खेळ खलास आणि नसलो तरी खेळ खलास, असे म्हणत विरोधकांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला. तसेच आता गणिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू, असेही ते म्हणाले.

मी आणि माझे आंदोलन

मी राजकारणात नाही. मी आणि माझे आंदोलन आहे. कोणी मला खवळले तर मी त्यांचा खेळ खल्लास करेन. लोकसभा पॅटर्ननुसार आम्ही आमची भूमिका घेणार आहोत.

कोणत्याही अपक्षाला पाठिंबा नाही

सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठींबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या