थकीत कर्ज का वसुल केले: बॅंक मॅनेजरवर हल्ला : दोन जण जखमी परळी (प्रतिनिधी) बॅंकेकडुन घेतलेले कर्जाचा भरणा न केल्याने परळी येथील डॉ.रविंद्र गायकवाड यांचे नियमाप्रमाणे थकीत कर्ज वसुली करणार्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक परळी शाखेचे शाखाधिकारी प्रशांत गरड यांना मारहाण करत जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून डॉ.रविंद्र गायकवाड यांनी कर्ज घेवून त्याची परतफेड केलीच नाही यासाठी बॅंकेने वेळोवेळी नोटीस पाठवुन नियमाप्रमाणे कारवाई केली.सदरील कारवाईचा राग मनात धरत उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे परळी शाखाधिकारी प्रशांत गरड यांना दि.७ डिसेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास फोन केला.प्रशांत गरड व बॅंकेतील कर्मचारी माधव शिंदे हे दि.७ रोजी दुपारी ३.१५ वाजता कामानिमित्त शाखेबाहेर आले असता घरणीकर रोडवर डॉ.रविंद्र गायकवाड हे तीन ते चार जणांना घेवुन आले व आमच्या मालमत्ता जप्तीबाबत वाद घालत शाखाधिकारी गरड व कर्मचारी शिंदे यांना शिवीगाळ करत एकाने दगडाने मार...
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साक्षी सुलाखे हिची न्यायालयीन कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार गेवराई :- बीड जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदी निवड झाल्याबद्दल साक्षी यशवंत( बंडू ) सुलाखे हिची निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी साक्षी सुलाखे हिचा पुष्पहार, शाल श्रीफळ व पेढे भरून निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साक्षी तिचे आई वडील सौ कल्पना सुलाखे व वडील यशवंत सुलाखे परिवारातील सदस्य श्वेता सुलाखे, विश्वांभर सुलाखे, राजेश जोशी संगीता जोशी अर्चना देशमुख सुनंदा कुलकर्णी अनिता कुलकर्णी अशोक देऊळगावकर मोहन राजहंस आदी हजर होते. दिनांक पाच डिसेंबर रोजी निवड झालेली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक झाले आहे व सर्वांनी अभिनंदन केले आहे. ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. यात अनेक कर्मचाऱ्यांना तपासणी करून उपचार करण्यात आले. परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर जागतिक एड्स पंधरवडा निमित्ताने रेल्वेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक शरद चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमोल गालफाडे, अविनाश व्हावळे, प्रियंका पोटभरे (डी.आर.डब्ल्यू.), वैभव गुळवे, रेल्वे सुरक्षारक्षक अविनाश गुप्ता, स्टेशन मास्तर तुळशीराम मीना, पांडे, टेक्निशियन दत्तात्रय मुंडे, सहाय्यक टेक्निशियन सुमितकुमार कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एमकेसीएलच्या वतीने परळी वैजनाथ च्या विजय कॉम्प्युटर्स चा पुरस्काराने गौरव परळी वैजनाथ: महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या वतीने बीड जिल्ह्यातून MKCL विविध क्लिक कोर्स चे २०२४ मध्ये सर्वात जास्त प्रवेश नोंदविले ” या साठी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या वार्षिक सभेत परळी वैजनाथ येथील अजयकुमार सावजी यांच्या विजय कॉम्प्युटर्स ला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांचे हस्ते विजय कॉम्प्युटर्स चे संचालक अजयकुमार सावजी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. गेल्या २० वर्ष्या पासून परळी वैजनाथ परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम घडविण्याचे काम सातत्याने विजय कॉम्प्युटर्स च्या माध्यमातून केले जाते. या मुळे दरवर्षी एमकेसीएल कडून सातत्याने विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यावेळी महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, दीपक पाटेकर विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, गजानन कुलथे लोकल लीड सेंटरचे विठ्ठल पांचाळ हे उपस्थित होते.या मिळालेल्या पुरस्कारा...
श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन परळी/प्रतिनिधी येथील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक प.पू.विलासानंदजी महाराज यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मित्ती मार्गशीर्ष शु.14 शके 1946 शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळील जागृत देवस्थान श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 12 ते 1 वा. महाआरती, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिराचे संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.
धक्कादायक कारण आलं समोर !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गंगाखेड :एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गंगाखेड हादरले होते. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे...
देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा- राज्यपाल सी. पी राधाकृष्णन मुंबई, दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधीत करीत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर,...