इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

धक्कादायक कारण आलं समोर !

गंगाखेड :एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्या प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेमागील गूढ अखेर उलगडले. मयत मुलीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची ब्लॅकमेलिंग वजा धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिक्षकीपेशातील कुटुंबाने बदनामीपेक्षा मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
          गंगाखेड शहरानजीकच्या धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर २८ नोव्हेंबरला दुपारी ममता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मसनाजी तुडमे, त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेमुळे गंगाखेड हादरले होते. आत्महत्या करणारे तुडमे कुटुंब लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी-कद्दू येथील रहिवासी होते. या तिघाच्या आत्महत्येमुळे तुडमे याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. या तिघांच्या मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
            या घटनासंदर्भाने जिल्ह्यासह राज्यभरात तर्कवितर्क लावण्यात आले. याप्रकरणी मसनाजी यांचे भाऊ फिर्यादी शिवाजी तुडमे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवम नारायण राऊत (२१, रा परभणी ) या तरुणाविरोधात गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
          मात्र तपास करताना पोलिसांना आरोपी तरुणाच्या मोबाइल सीडीआरवरून संशय बळावला. चौकशीसाठी आरोपीस बोलाविले असता संबंधित मुलीस आणि कुटुंबास ब्लॅकमेलिंग करत आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व्हायरल केल्याचे कबूल केले. यावरून ४ डिसेंबरला रात्री गंगाखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.



     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या