पोस्ट्स

इमेज
मंत्रिमंडळात मुंडे व कदम परिवारातील दुसर्‍या पिढीचा  असाही एक योगायोग ! मुंबई- राजकारणामध्ये अनेक बाबींची पुनरावृत्ती होत असते किंवा एका घटनेची साधर्म्य  सांगणारी दुसरी घटना काळाच्या ओघात घडताना दिसते. काही योगायोग हे अधोरेखित होत असतात. एकाच मंत्रिमंडळात मुंडे बहिण भाऊ कॅबिनेट मंत्री असा एक योगायोग असताना मुंडे व कदम परिवारातील दुसर्‍या पिढीच्या बाबतीतही एक योगायोग बघायला मिळत आहे.        राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाचे राज्यमंत्री म्हणून योगेश रामदास कदम यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांनी आज धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. स्व. गोपीनाथराव मुंडे राज्याचे गृहमंत्री असताना रामदास भाई कदम हे त्याच खात्याचे राज्यमंत्री होते, आज धनंजय मुडे यांच्याकडे ज्या विभागाचा कार्यभार आहे त्याच खात्याचे राज्यमंत्रीपद योगायोगाने श्री. योगेश कदम यांना मिळालेले आहे. मुंडे आणि कदम कुटुंबातील हा योगायोग दुसऱ्या पिढीपर्यंत ही चालत आलेला दिसुन येत आहे. 
इमेज
सर्व कार्यक्रम रद्द करून पंकजा मुंडेंनी अत्यंत साधेपणाने घेतला पदभार मुंबई- राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातील दालनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करून अत्यंत साधेपणाने पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली. प्रथम गणेशाची पुजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.          तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इमेज
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द! मुंबई, प्रतिनिधी...        देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे.या अनुषंगाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयातील आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.       माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, "माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे  दुःखद निधन झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांचे योगदान देशवासियांना सदैव स्मरणात राहील. आदरांजली म्हणून माझे मंत्रालयाच्या दालनातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची नोंद घ्यावी. सर्वांनी सोमवार नंतर भेट घ्यावी ही विनंती." -पंकजा गोपीनाथ मुंडे.  मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन -महाराष्ट्र राज्य.
इमेज
  परळीत गळफास लावून एका युवकाची आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      आनंदनगर, पद्मावतीगल्ली भागात संत नरहरी महाराज मंदिर परिसरातील रहिवासी एका युवकाने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा.घडली आहे.याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.      पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दि.27 रोजी मध्यरात्रीनंतर 2 वा. सुमारास मयत युवकाने घरातीलच लोखंडी हुकाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.मनोज मारोती काळे वय ४१ वर्षे असे मयताचे नाव आहे.दारुच्या नशेत त्याने ही आत्महत्या केली असल्याचे कारण पोलिसात दिलेल्या प्रथम खबरीत देण्यात आलेले आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सफौ सौंदनकर हे करीत आहेत.
इमेज
  अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन नवी दिल्ली  :  देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे साधे जीवन जगणारे नेते होते. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताह...

स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी - धनंजय मुंडे

इमेज
  स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हावी, पहिल्या दिवसापासून माझी मागणी - धनंजय मुंडे या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठवायचा डाव - धनंजय मुंडे मुंबई (दि. 26) - मसाजोगचे तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासून ची मागणी आहे असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.  धनंजय मुंडे यांनी आज अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारत विभागाचा आढावा घेतला. सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झालेल्या या आढावा बैठकीनंतर धनंजय मुंडे माध्यमंशी बोलत होते.  बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आर...

संतोष देशमुख माझा बुथप्रमुख, लेकराला न्याय मिळेल

इमेज
  पदभार घेण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे कोल्हापूर महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक विभागाचा घेतला आढावा ; कार्यकर्ते, उद्योजकांशी साधला संवाद नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार कोल्हापूर ।दिनांक २६। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे उद्या शुक्रवारी (ता. २७) आपल्या मंत्रालयीन दालनात पदभार घेऊन कामकाज सुरू करणार आहेत. पदभार घेण्यापूर्वी त्यांनी आज कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मला जे खाते मिळाले आहे ते सृष्टीला वाचवण्यासाठीचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं योगदान मी यात देणार आहे.  पर्यावरणाच्या माध्यमातून नद्यांना प्रदुषण मुक्त करण्यासाठी  पुढाकार घेणार आहे, यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.    ना. पंकजाताई मुंडे आज कोल्हापूर दौर्‍यावर होत्या. सकाळी त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं आ. अमल महाडिक व भा...