सर्व कार्यक्रम रद्द करून पंकजा मुंडेंनी अत्यंत साधेपणाने घेतला पदभार

मुंबई- राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातील दालनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करून अत्यंत साधेपणाने पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली. प्रथम गणेशाची पुजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. 

        तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार