काय आहे धनंजय मुंडे यांची X पोस्ट?

अंजली दमानियांविरुद्ध लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला- धनंजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी... सातत्याने व बिनबुडाचे आरोप करून केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धीलोलूपतेत रममाण तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरुद्ध लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. काय आहे धनंजय मुंडे यांची X पोस्ट? अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. *अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार - धनंजय मुंडे* *कृषी वि...