– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...
श्री.साईबाबा मंदिरात परळी माहात्म्य पारायण व कथा महायज्ञ !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
         श्री.साईबाबा मंदिरात परळी माहात्म्य पारायण व कथा महायज्ञ सुरु असुन भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
            श्री. साईबाबा मंदिर, वल्लभनगर, परळी-वै. येथे शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ पासून दररोज सायंकाळी ०५:३० ते ०:६:३० पर्यंत परळी माहात्म्य ग्रंथाचे पारायण व कथा महायज्ञ समारंभ सुरु झाला आहे.ह.भ. प. श्री.रवींद्र महाराज वेताळ गुरुजी, श्री. साईबाबा मंदिराचे पुजारी, परळी-वै हे कथाकार आहेत.भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या