– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

काय आहे धनंजय मुंडे यांची X पोस्ट?

अंजली दमानियांविरुद्ध लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला- धनंजय मुंडे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

  सातत्याने व बिनबुडाचे आरोप करून केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धीलोलूपतेत रममाण तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरुद्ध लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांची X पोस्ट?

अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा  पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे,  त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई  यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.

*अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार - धनंजय मुंडे*


*कृषी विभागातील ती खरेदी नियमाप्रमाणे व मुख्यमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनेच झालेली धनंजय मुंडे यांनी पुन्हा केले स्पष्ट*


मुंबई (प्रतिनिधी) - अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आता ट्विट केले आहे. 


अंजली दमानिया यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेत कृषी विभागाने मार्च 2024 मध्ये राबवलेल्या विविध खरेदी बाबत अर्धवट माहितीच्या आधारे व एका वेबसाईटवरील भावांचे संदर्भ देत काही वस्तूंची चुकीच्या पद्धतीने खरेदी झाल्याचे आरोप करत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. 


तसेच सदरील खरेदी प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. यावर तत्कालीन कृषी मंत्री व सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा सादर केला तसेच संपूर्ण प्रक्रिया ही खरेदी प्रक्रियेच्या नियमातील तरतुदीनुसार तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वित्त यांच्या मान्यतेनुसारच झाली होती असे स्पष्ट केले होते. 


त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून, नॅनो खते देणाऱ्या इफको कंपनीकडून भारतात सर्वत्र एकाच दराने ही खते विकली जातात. मोठ्या प्रमाणात खरेदी असल्याने तरीसुद्धा संबंधित कंपनीकडे जवळपास आठ रुपये प्रति लिटर इतका दर कमी करण्यात आला होता तसेच हा दर देशात सर्वात कमी महाराष्ट्रात होता ही वस्तुस्थिती आहे. 


त्याचबरोबर ने स्प्रे पंप खरेदी, कापूस भरणा बॅग खरेदी तसेच गोगलगाईंचा प्रादुर्भाव नष्ट करणाऱ्या मेटलडीहाईड या रसायन्याची खरेदी सुद्धा प्रमाणित शासकीय दराप्रमाणे तसेच अतिशय पारदर्शक पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवूनच करण्यात आले होते हे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट होते. 


अंजली दमानिया बिनबुडाचे व खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि मीडियावर प्रसिद्धी मिळवून आपले हेतू साध्य करून घेतात असा धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप अंजली दमानिया यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत असून आता अंजली दमानिया या विचलित झाल्या असून पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आल्या व बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत सुटल्याचे दिसून आले. 


मागील 58 दिवसांपासून कुठल्याही तपास प्रक्रियेवर काही प्रभाव पडू नये म्हणून शांत व संयमाने राहिलेले धनंजय मुंडे यांनी मात्र आता अंजली दमानी यांच्या खोट्या आरोपांवर मौन सोडले आहे. तर अंजली दमानिया यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला (criminal differmation case) दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या