
सुरेश धसांनी आरोप करतांना काढले कौटुंबिक विषय: धनंजय मुंडे उद्विग्न: धसांचा घेतला चांगलाच समाचार सातत्याने धनंजय मुंडे यांना टार्गेट करून आरोप करणारे सुरेश धस यांनी आता पातळी सोडली असुन आरोप करतांना ते धनंजय मुंडे यांचे कुटुंब व परिवारजन इथपर्यंतही बेताल वक्तव्य करतांना दिसत आहेत.यावर आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले असुन त्यांनी फेसबुक व अन्य सोशल माध्यमातून पोस्ट करून सुरेश धस यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. शनिवारी एका वाहिनीवर बोलतांना सुरेश धस यांनी पुन्हा मुंडेंवर निशाणा साधला. 'धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते की, त्यामुळे घरातील लोकसुद्धा त्यांच्यावर नाराज असतील, त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत,' असे सुरेश धस म्हणाले. धसांच्या या विधानावर मुंडेंनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.धनंजय मुंडेंनी ट्विट करत धसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.धनंजय मुंडे म्हणाले, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्याय...