घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश,

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 25 मार्च पासून ऑनलाईन नोंदणी- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 मधील पुजांची होणार नोंदणी, घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी, चंदनउटी पूजेचा देखील समावेश पंढरपूर (ता.19) - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.25 मार्च रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीच्या दि. 03 मार्च रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्ट...