बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू, परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध 

बीड  जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं बीड जिल्ह्यातील वातावरण गरम आहे.जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे.

      जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च मध्य रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील. राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांचे न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने, उपोषण मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई हुकूम जारी करण्यात आला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!