खळबळजनक.......

 बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

केज :- सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.


केज तालुक्यातील ढाकेफळ येथील पूजा अनभुले यांचा बारा वर्षाचा मुलगा चि. अदित्य अनभुले हा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय अंबाजोगाई येथे इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. तो अंबाजोगाई येथे सारथी मुलांचे हॉस्टेलमध्ये राहतो. होळीच्या सणाला तो ढाकेफळ येथे घरी आला होता.

त्या नंतर दि. १७ मार्च रोजी सकाळी ८:०० वा. च्या सुमारास तो शाळेत जाण्यासाठी गेला. हॉस्टेलला पोहचल्यावर त्याने फोन केला नाही, म्हणुन त्याच्या आईने दुपारी १२:०० वा. च्या सुमारास हॉस्टेलमध्ये रोमन मॅडम यांना फोन केला असता; त्यांनी आदित्य हॉस्टेलला आला नाही, असे सांगीतले. म्हणून त्या नंतर त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून त्याची आई पुजा दत्तात्रय अनभुले यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. ७६/२०२५ भा. न्या. सं. १३७ (२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!