
यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शनिवारी वार्षीक स्नेहसंमेलन ; कार्यक्रमास उपस्थित राहावे-विलास खाडे बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते उद्घाटन तर कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडेची उपस्थितीत लाभणार परळी वैजनाथ / दिंद्रुड (प्रतिनिधी) :- कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २९ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले असुन या संमेलनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक विलास खाडे व यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले. यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बीड चे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे सहस...