प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

त्वरित नावनोंदणी करा.....त्वरा करा....

परळीत २ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा ४५ वा.सामुदायिक  उपनयन संस्कार सोहळा!

नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-

   ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आद्य शंकराचार्य जयंतीदिनी येत्या २मे २०२५ रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.

         गेल्या ४४ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आद्य शंकराचार्य जयंतीदिनी शुक्रवार दिनांक २ मे २०२५ रोजी दर्शन मंडप वैद्यनाथ मंदिर परळी वै. येथे १०.३१ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी ११०० रु.नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.या सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळ्यात आपल्या उपनीत मुलांची नावनोंदणी करण्यासाठी बंडू महाराज टिंबे (दक्षिणमुखी गणेश मंदिर परळी वै.) मो.क्र. ८९७५ २९२१११, श्रीकांत करमाळकर मो. क्र. ७०२०८०१३७८, मनोज जबदे(ओंकार शुभमंगल सेवा,गणेशपाररोड,परळी वैजनाथ) मो.क्र. ९४२०७८५३३१, सचिन जोशी (न्यु जोशी मेडिकल, मोंढा परळी वै.) मो.क्र. ९९२२ २६१७४०, शिरिष राजुरकर(वैद्यनाथ मंदिर) मो.क्र. ७५०७०५२०५०, चारुदत्त करमाळकर (डेनिम हाईक) मो.क्र. ९०२८०३४३८४, जयराम गोंडे (स्माईल फोटो स्टुडीओ) मो.क्र.९८२३ १३७२९५,गिरीश प्रयाग (प्रयाग इलेक्ट्रिकल I D B I बँकेसमोर) ९०२८८१११ ७२,विश्वांभर देशमुख ९६५७६५६९५१ (व्यंकटेश एन्टरप्रायजेस) प्रमोद औटी,(साई विठ्ठल मल्टिसर्व्हिसेस राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक) मो.क्र. ९०२८८१११७३, प्रदीप अग्निहोत्री(प्रसाद जनरल स्टोअर्स) मो.क्र.९०२८९०४०९०, हेमंत लोंढे (सिरसाळा) मो.क्र.९४२३७५७२१५, कृष्णागुरु जोशी (नागापूर) मो.क्र. ९६८९८५११६१, गोविंद जोशी बर्दापूर मो.क्र.९७६३७३३४६५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या