
खळबळजनक घटना: कोयत्याने वार करून केला खून अन् आरोपी स्वतःच कोयत्यासह पोलीस ठाण्यात माजलगाव, प्रतिनिधी.... शहरात अतिशय खळबळ उडवून देणारी घटना घडली असून एका युवकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीने या युवकाचा कोयत्याने वार करून खून केला आणि आरोपी स्वतःच रक्ताने माखलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माजलगाव शहरातील एका युवकाचा आरोपीने कोयत्याने वार करून खून केला. या खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आरोपी स्वतः खूनात वापरलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान कोणत्या गंभीर कारणासाठी अशा पद्धतीने खून करण्यात आला हे मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मयताचे बाबासाहेब आगे असे नाव असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.