इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत --प्राचार्य,डॉ विठ्ठल घुले

परळी प्रतिनिधी... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजर्षी शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले यांनी  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.ए आर  चव्हाण व्याख्याते, प्राचार्य विठ्ठल घुले,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पी एल कराड ,उप प्राचार्य प्रा डी के आंधळे व डॉ. व्हि बी गायकवाड, प्रा हरीश मुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ बी.के शेप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात प्रकाश टाकला व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ विठ्ठल घुले यांनी भारतीय संविधानातील मूलभूत तत्वे मानवी समाजासाठी उपयुक्त आहेत असे सांगून डॉ बाबासाहेबांचे कार्य अखंड महासागरासारखे आहे. त्यांच्या  प्रत्येक पैलूवर संशोधन करता येईल असे सांगून बाबासाहेबांचे विचार सर्वांनी अंगीकृत करावे असे मत प्रतिपादन केले. गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकरांनी गुरु मानून त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले असेही मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर डॉ आंबेडकरांनी विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून आणण्याचे कार्य केले असेही सांगितले कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्या, डॉ ए आर  चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करील तो गुर गुर केल्याशिवाय राहणार नाही असे मत सांगून शिका संघटित व्हा व संघर्ष करा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर जे चाटे तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर डी राठोड यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या