इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आ.धनंजय मुंडे यांनी केली वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांची पाहणी


मंदिर व परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना


परळी वैद्यनाथ (दि. १४) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या 286 कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहणी केली. 


मंदिर परिसरात भव्यदर्शन मंडपाचे काम सुरू असून आता चौथ्या मजल्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी ग्लास री-इन-फोर्सड काँक्रीट पद्धतीने काम पूर्ण करावे, दगडी पायऱ्यांचे काम तसेच परिसरातील अन्य वस्तूंच्या कामाच्या संदर्भात पुरातन महत्व जपून तसेच दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केले जावे अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 


वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी २८६.६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून यातून आतापर्यंत एका भव्य अशा भक्त निवासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रदक्षिणामार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून, भव्य असे प्रवेशद्वार दगडी पायऱ्या दर्शन मंडप अशी कामे सध्या सुरू आहेत. 


मंदिर परिसरातील वास्तूंचे पुरातन महत्व जपण्याबरोबरच दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत काम पूर्ण करावेत अशा सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधितांना केल्या. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, राजा खान, जाफर खान, आर्किटेक्ट श्री बांगड, शिल्पकार गनीभाई यांसह अधिकारी - कर्मचारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या