सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला

वैद्यनाथ मंदिरात देवदर्शनास आलेल्या भाविकाचा मोबाईल एकाने चोरला पण लगेचच.... सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला परळी वैजनाथ – प्रतिनिधी... वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा त्यांना परत मिळाला. ही घटना मंदिर परिसरात घडली. हडपसर, पुणे येथील संतोष साहेबराव गठाळ (वय ४९) हे रविवार १५ जून रोजी वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्यातून बाहेर पडताना त्यांच्या मागील खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याची तक्रार त्यांनी तात्काळ मंदिरातील पोलीस चौकीत दिली.त्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके आणि मंदिराचे सुरक्षा सेवेकरी यांनी तात्काळ तपास सुरू केला. अन्नछत्र व मंदिराच्या पायऱ्यांजवळ तपास घेत असताना तेलंगणा राज्यातील सुधाकर नामक व्यक्तीकडे हरवलेला मोबाईल सापडला. त्याला चौकीत आणण्यात आले. पुढील चौकशीनंतर हरवलेला मोबाईल संतोष साहेबराव गठाळ ...