
परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा उच्छाद ;चोरीच्या घटनांत पोलीस उदासीन पत्रकाराने चोर पकडून देणारास जाहीर केलं बक्षीस परळी, प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा वचक राहावा म्हणून आय.पी.एस. अधिकारी नवनीत कावंत यांची एस.पी.म्हणून बीड जिल्हा येथे पाठवण्यात आलं, परंतु सुरुवातीला काही दिवस वाटलं होतं, पोलीस प्रशासनाने आपली आलेली मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. तसा काही जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी आव देखील आणला व थातूरमातूर पोलीस कारवाया दाखवून एस.पी.नवनीत कावत यांचे मनही जिंकले. पण कार्यपद्धती बघून अनेकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या परंतु आता परिस्थिती पहिल्यासारखीच जैसे थे आहे. खलनिग्रणाय सदरक्षणाय पोलीस प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी, अडचणीसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करावं लागतं, परंतु त्याला हरताळ फासत, पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी काम करत आहेत असंच चित्र सध्या दिसत आहे. मटका, गुटका, बिंगो, ऑनलाइन लॉटरी,पत्तेचे क्लब,अवैध धंदे, हातभट्टी विक्रेते, यांना खुलेआम विक्री करण्याची परवानगी दिली आहे का ? असे चित्र सध्या पर...